scorecardresearch

“तो अनिरुद्धला अन्या म्हणाला अन् त्यानंतर….”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील सर्वच पात्र ही कायम चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी शेखर म्हणजेच अभिनेता मयूर खांडगेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाचा पहिला नवरा शेखरचे पात्र मयूर खांडगे साकारत आहेत. त्याची ही भूमिका प्रचंड गाजत आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीने मयूर खांडगेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये मयूरच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केले आहे.

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींची इन्स्टाग्राम पोस्ट

“मयूर खांडगे…..
ज्याच्या येण्याने चैतन्य येतं सेटवर, तो आला की वातावरणच बदलत, त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की.. सीन विषयी चर्चा असते. सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं.

बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखर चे, तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार, खूप बोलणार, बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते.

आई कुठे काय करते या सिरीयल मध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेक वेळा बदली आहेत. बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्ध साठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला, तो म्हणजे अन्या देशमुख, अनिरुद्ध ला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला”, असे मिलिंद गवळी म्हणाले.

‘दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत?’ सलमानच्या प्रश्नावर दाक्षिणात्य सुपरस्टारने दिले उत्तर, म्हणाला “एका रात्रीत…”

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर मालिकेतील अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. यावर अनेकजण प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte milind gawali share instagram post for shekhar aka mayur khandge nrp

ताज्या बातम्या