छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. सध्या या मालिकेत अनिरुद्धची आई कांचन देशमुख यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला घराघरात एक वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे. नुकतंच अरुंधतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

मधुराणी प्रभूलकर या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती नेहमी मालिकेतील विविध भागांवर भाष्य करत असते. नुकतंच मधुराणीने जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल झाली आहे. या पोस्टद्वारे तिने तिचा सेटवर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच पुस्तक वाचनाचे काही किस्से सांगितले आहे.

Video : “आता तू यांचा सांभाळ कर…”, लेकासोबत IPL सामना पाहिल्यावर रितेश देशमुखचा जिनिलियाला सल्ला

मधुराणीची इन्स्टाग्राम पोस्ट

मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं, भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं….वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक, मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात… तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची…. जमेल तसं…दोन पानं कधी चार. पण वाचायचं…वाचत राहायचं.

जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सध्या मी वाचत असलेली पुस्तकं १. मंद्र . भैरप्पा, २. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने, ३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख…तुम्ही काय वाचताय??? असे मधुराणी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत तिने कोणती पुस्तक वाचताय असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहे.

जेव्हा भुकेने व्याकूळ झालेल्या वरुण धवनसाठी दिव्या भारतीने बनवले होते ऑम्लेट, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या

मधुराणीच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी ते कोणती पुस्तक वाचत आहे, याची माहितीही दिली आहे. त्यावर मधुराणीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाह सगळे वाचतायत हे वाचून आंनद झाला’, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाइक्सही मिळाले आहेत. तसेच तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.