छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच पात्र ही कायमच चर्चेत असतात. पण या मालिकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतंच या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत अरुंधतीही पत्रकारांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते या मालिकेत नवनवीन रंजक गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवरील मराठी सिरीयल्स नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने या मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात अरुंधती ही गाण्याच्या संधीवरुन विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांना स्पष्ट शब्दात उत्तर देताना पाहायला मिळत आहे.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”

आशुतोष केळकरने अरुंधतीला गाण्याची संधी दिल्यानंतर ती त्याचे सोनं करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनिरुद्धसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती तिच्या गाण्याला, कामाला महत्त्व देताना दिसत आहे. नुकतंच तिचे एक गाणे रेकॉर्ड झाले असून लवकरच ते प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने मालिकेत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाते.

यावेळी या कार्यक्रमात त्या अल्बमची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान आशुतोष, अरुंधती आणि संजनाही उपस्थित असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अनिरुद्धही या कार्यक्रमात एका कोपऱ्यात खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक पत्रकार समोर बसलेले असतात. त्यावेळी एक पत्रकार विचारतो, अनेक नवनवीन गायक येत आहे, असे असताना तुम्हाला एवढी मोठी संधी देण्यामागचे कारण काय?. त्यावर अरुंधती रोखठोक उत्तर देते.

‘त्या’ लालसेपोटीच प्रतीकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलास, हृता दुर्गुळेने सांगितला ट्रोलिंगचा धक्कादायक किस्सा

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न उपस्थित होतं आहे. पण आज जाहीरपणे याचे उत्तर देते. केवळ मैत्री म्हणून आशुतोषने मला ही संधी दिली असती तर इतक्या लोकांना माझं गाणं आवडलं नसतं. माझ्या वाट्याला जे आलं त्याला मी १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे उत्तर अरुंधती यावेळी देते. दरम्यान अरुंधतीचे हे उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.

दरम्यान या मालिकेचा हा नवा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी सिरीयल्सच्या पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.