आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं बेबीमून, सोनम कपूरच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या बेबीमून एण्जॉय करताना दिसत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं बेबीमून, सोनम कपूरच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या बेबीमून एण्जॉय करताना दिसत आहेत.

बॉलिवूडची डार्लिंग आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. गरोदर असूनही आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याचे आगमन कधी होणार? याबाबत त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. पण त्याचबरोबरीने सध्या रणबीर-आलिया परदेशात गेले आहेत.

आणखी वाचा – Photos : दर महिन्याला मेकअपसाठी किती खर्च करता? अमृता फडणवीस म्हणाल्या…

रणबीर-आलियाचे मुंबई विमानतळावरील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. आता आलियाने देखील तिचा एक सेल्फी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. कामामधून ब्रेक घेत रणबीर-आलिया सध्या सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहेत. हे दोघं बेबीमूनला गेले असल्याचं अभिनेत्री सोनम कपूरने स्पष्ट केलं आहे.

आलियाने इन्स्टाग्रामद्वारे फोटो शेअर करताच अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. पण सोनमची कमेंट अधिक लक्षवेधी ठरली आहे. सोनमने कमेंट करत म्हटलं की, “मी देखील माझ्या बेबीमूनसाठी इथेच गेली होती. हे ठिकाण खूप मस्त आहे. एण्जॉय करा.” सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा बेबीमूनसाठी इटलीमध्ये गेले होते.

आणखी वाचा – ३८ वर्षांची मैत्री, बँकमध्ये नोकरी अन्…; प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल बोलताना विजय पाटकर भावूक

रणबीर-आलिया देखील इटलीलाच गेले असल्याचं सोनमच्या कमेंटमधून स्पष्ट होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीरच्या घरी डिसेंबर महिन्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होईल असं म्हटलं जातंय. कपूर कुटुंब यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाला, ‘तुला मुलगा हवा आहे की मुलगी?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आलियाने, “होणारे बाळ स्वस्थ असावे” असे उत्तर दिले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aalia bhatt share photo from italy actress enjoy babymoon with husband ranbir kapoor see details kmd

Next Story
Koffee With Karan 7: “माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रीणींबरोबर …. “, सोनम कपूरने केली कपूर भावंडांची पोलखोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी