अनुराग कश्यपच्या मुलीने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आली. त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकी बॉयफ्रेंडसोबत बोल्ड फोटोमुळे चर्चेत आलीय.

aaliyah-kashyap-shares-romantic-pics-with-boyfriend
(Photo: Instagram/ aaliyahkashyap)

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आलीय. सध्या ती अमेरिकी बॉयफ्रेंड शेन ग्रीगोइरे याला डेट करतेय. आलिया कश्यप अनेकदा बॉयफ्रेंड शेन सोबत फोटोज शेअर करत असते. पुन्हा एकदा ती बॉयफ्रेंडसोबत रोमॅण्टिक होताना दिसून आली. नुकतंच तिने तिल्या सोशल मीडिया अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचे खाजगी फोटोज शेअर केले आहेत. यात तीन बॉयफ्रेंड शेनसोबत बरीच इंटीमेट होताना दिसून आली.

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनेक स्टारकिड्स पैकी एक आहे. नुकतंच आलियाचा बॉयफ्रेंड शेन याने २४ ऑगस्ट रोजी आपला २२ वा वाढदिवस साजरा केला. आलिया कश्यपने आपल्या खास अंदाज आपल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचे काही रोमॅण्टिक फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया बॉयफ्रेंडसोबत बरीच इंटीमेट होताना दिसून आली. काही फोटोजमध्ये शेन आलियाला लिप लॉक करताना दिसून आला तर काही फोटोजमध्ये त्याने आलियाला उचलून घेतलंय. आलियाने शेअर केलेले हे बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज खूपच बोल्ड आणि रोमॅण्टिक आहेत. शेन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने तिचे हे खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलियाने शेअर केलेले फोटोज जितके रोमॅण्टिक आहेत, तितकीच रोमॅण्टिक त्यासोबतची कॅप्शन सुद्धा आहे. “माझ्या प्रेमाला 22 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…. ज्याने मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी ठरवलं…तू मला भेटलास हे मी माझं नशीब समजते….मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील.”, असं लिहित तिने हे फोटोज शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)


आलियाने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे फॅन्स या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. सोबतच तिच्या या फोटोवर कमेंट्स करत फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : Ponniyin Selvan : चित्रपटातला ऐश्वर्या राय बच्चनचा फर्स्ट लूक झाला लीक; दिसला महाराणी अवतार

आलियाचा बॉयफ्रेंड शेन यांचं अनुराग कश्यपच्या घरी येणं-जाणं सुद्धा होत असतं. आलिया यापूर्वी अनेकदा याबाबत तिच्या युट्यूब चॅनलवर बोलताना दिसून आली आहे. आलिया तिच्या खाजगी आयुष्याबाबत बिनधास्तपणे गप्पा मारत असते. तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी ती फक्त वडील अनुराग कश्यपसोबतच नव्हे तर पब्लिक प्लॅटफॉर्मवरसुद्धा तितक्याच बिनधास्तपणे व्यक्त होत असते. यापूर्वी तिने शेनसोबत मुंबईत फिरतानाचे व्हिडीओ सुद्धा तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aaliyah kashyap shares romantic pics with boyfriend on his birthday prp