किरण राव ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय निर्माती, दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून ओळखली जाते. किरण राव आणि अभिनेता आमिर खान हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक होते. पण जेव्हा त्यांनी घटस्फोट घेतल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला माहितीये का किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास ५० कोटी रुपये मोजावे लागले होते.

किरण रावचा जन्म ७ नोव्हेंबर १९७३ साली एका शाही कुटुंबात झाला. १९९२ साली किरणचे वडील मुंबईत शिफ्ट झाले होते. मुंबईतील सोफिया कॉलेजमधून किरणचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर तिने दिल्लीत जाऊन मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. करिअरच्या सुरुवातील किरण रावने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ‘लगान’ चित्रपटासाठी तिने आशुतोष गोवारिकर यांना असिस्ट केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण राव यांची ओळख झाली होती.
आणखी वाचा : ‘जय भीम’ चित्रपटातील त्या सीनवर जोरदार टीका, हटवण्याची केली जातेय मागणी

किरण आणि आमिरची पहिली भेट २००१ मध्ये ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी आमिर खान विवाहीत होता. आमिर आणि किरणचे एकदा फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००२ साली आमिरने पत्नी रिना दत्तला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आमिर आणि किरण जवळपास तिन वर्षे एकमेकांना डेट करत होते. २००५ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, किरणशी लग्न करण्यापूर्वी रिनाला घटस्फोट देण्यासाठी आमिरला जवळपास ५० कोटी रुपये मोजावे लागले होते. आमिरने पोटगी म्हणून रिनाला ५० कोटी रुपये दिले होते. त्यानंतर जवळपास तिन वर्षांनंतर आमिर आणि किरणने लग्न केले होते. पण लग्नाच्या १५ वर्षांनंतर किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला आहे. त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.