scorecardresearch

VIDEO : “घटस्फोट म्हणजे खेळ नव्हे”, आमिर खान-किरण रावचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले लोक

घटस्फोटानंतर अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा एकत्रित व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला आहे.

entertainment,bollywood
घटस्फोटानंतर अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा एकत्रित व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण रावने जवळपास १५ वर्ष एकत्र संसार केला. मात्र गेल्या वर्षी दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला असला तरी आमिर-किरणमध्ये अजूनही चांगली मैत्री असल्याचं दिसतं. करण जोहरच्या ५०व्या बर्थ डे पार्टीला दोघांनीही हजेरी लावली होती.

या पार्टीदरम्यानचा दोघांचा एकत्रित व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. आमिर-किरण एखाद्या जोडप्याप्रमाणे फोटोसाठी पोझ देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. घटस्फोट झाल्यानंतर दोघांनाही एखाद्या जोडप्यासारखं वावरताना पाहून नेटकऱ्यांनी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – VIDEO : हातात हात घालून एंट्री केली अन्…; गर्लफ्रेंडला घेऊन पार्टीमध्ये पोहोचला हृतिक रोशन

आमिर-किरण घटस्फोट झाल्यानंतर आपल्या मुलांसाठी एकत्र येताना दिसले होते. मात्र आता व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही राग अनावर झाला आहे. आधी लग्न म्हणजे या लोकांना खेळ वाटायचा आता घटस्फोटही यांना खेळ वाटू लागला आहे, यांचा तर घटस्फोट झाला होता ना?, जर एकत्रच राहायचं होतं एखाद्या जोडप्यासारखंच तर घटस्फोटच का घेतला? अशा अनेक कमेंट्स आमिर-किरणच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – सोनाली कुलकर्णीने सासरी पहिल्यांदाच बनवला गोड पदार्थ, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. किरणच्या आधी आमिरने रीना दत्ताशी लग्न केलं होतं. १६ वर्षांनंतर आमिर आणि रीना २००२ मध्ये विभक्त झाले. २००५ मध्ये किरण आणि आमिरने लग्न केलं. पण त्याचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan and his ex wife kiran rao brutally trolled for give pose like couple at karan johar 50th birthday party video viral on social media kmd

ताज्या बातम्या