आमिर-किरणच्या घटस्फोटावर जवळच्या मित्राचं वक्तव्य; ‘समजवण्याचा प्रयत्न केला, पण…’

आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे

Kiran Rao, amin hajee on aamir khan and kiran rao divorce, Amin Hajee, aamir khan and kiran rao friend amin hajee, Aamir Khan and Kiran Rao Divorce, Aamir Khan and Kiran Rao, Aamir Khan,
दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणच्या जवळचा मित्र अमीन हाजी याने त्यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केले आहे.

अमीन हाजीने २००५मध्ये किरण आणि आमिरच्या लग्नाला हजेरी लावली होती. जेव्हा किरण आणि आमिरने विभक्त होत असल्याचे अमीन व त्याच्या पत्नीला सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. एका मुलाखतीमध्ये अमीन म्हणाला, ‘आम्ही आमिर आणि किरणला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यांचा निर्णय आधीच घेतला होता. त्यामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.’

आणखी वाचा : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान राहतो ‘या’ आलिशान घरात, पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

पुढे अमीन म्हणाला, ‘आमिर आणि किरणमध्ये मैत्रीचे नाते कायम राहणार आहे. त्यांच्या खासगी गोष्टींचा कामावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी ते काळजी घेत आहेत. आज सकाळीच मला किरणचा मेसेज आला आहे. तिने आमिर आणि मुलगा आझादसोबतचा कारगिल येथील फोटो शेअर केला आहे. जेथे ते लाल सिंह चड्ढाचे चित्रीकरण करत होते.’

स्टेटमेंटमध्ये काय म्हणाला आमिर?
“१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते, विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असे आमिर आणि किरण स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, “मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan and kiran rao friend amin hajee talks about couple divorce avb

ताज्या बातम्या