बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिरचा आज ५७ वा वाढदिवस आहे. आमिर हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आयुष्यात मिळालेली सगळ्याच सर्वोत्तम भेटवस्तू कोणती याविषयी खुलासा केला आहे.

आमिरला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला मिळालेली सर्वोत्तम भेटवस्तू कोणती असा प्रश्न विचारला? यावर आमिर म्हणाला, “किरणजींनी मला आयुष्यातील सर्वोत्तम भेट दिली आहे. तिचे आणि माझे नाते सगळ्यात वेगळे आहे. एवढचं काय तर ती मला सर्वात जवळून ओळखते. मी तिला विचारले होते की माझ्यात कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या त्रुटी आहेत, ज्या मी सुधारू शकतो. त्यावेळी तिने मला माझ्याबद्दल अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असे मला जाणवले. ती जे म्हणाली ते ऐकूण मला जाणवले की आपल्या जवळची व्यक्तीला आपल्यातल्या कोणत्या गोष्टी आवडतात किंवा आवडत नाही. ते ऐकल्यानंतर मी त्या गोष्टींवर काम सुरु केले.”

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

आमिर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. याविषयी बोलताना आमिर म्हणाला, “चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित व्हावा अशी आमची इच्छा होती. आता असे दिसते की आम्हाला आमचा चित्रपट पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल. चांगला चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.