scorecardresearch

आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये आमिर खान देणार चाहत्यांना सरप्राईज, क्रिकेटच्या मैदानात करणार नवा प्रयोग!

आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी तो एक नवा प्रयोग करणार आहे.

Laal Singh Chaddha, Aamir Khan,
आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी तो एक नवा प्रयोग करणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी जीव ओतून मेहनत घेतो. एकाच चित्रपटावर अधिक काळ आणि परफेक्ट काम करणं ही आमिरची खासियत आहे. आपली भूमिका रुपेरी पडद्यावर अगदी प्रेक्षकांना आपल्यातली वाटावी म्हणून तो अनेक प्रयत्न करतो. त्याची मेहनत प्रत्येकवेळी त्याच्या चित्रपटांमधून आपण पाहिलीच आहे. आता आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचं सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. आता त्याने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी एक नवा पर्याय निवडला आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. आता यासाठी प्रेक्षकांना फारकाळ वाट पाहावी लागणार नाही. कारण आमिरने एक नवी युक्ती लढवली आहे. यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार असल्याचं बोललं जातंय. आयपीएलमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल.

आणखी वाचा – Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आमिर आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरात चित्रपट पोहचावा म्हणून ही युक्ती लढवली आहे. २९ मे २०२२ला आयपीएलचा अंतिम सामना असणार आहे. म्हणजेच क्रिकेटच्या मैदानामध्ये यंदा आमिरची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसणार आहे. तसेच स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी देखील हे मोठं सरप्राईज असणार आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील हा पहिलाच मोठा ट्रेलर लाँच सोहळा असणाऱ असल्याचं बोललं जात आहे. क्रिकेट सामन्याच्या सेकंड हाफमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रदर्शित केला जाईल. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आमिरबरोबर करीना कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan film laal singh chaddha trailer unveiled ipl premier 2022 finale kareena kapoor khan kmd