बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आयरा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच आयराने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी आयरा बिकिनीमध्ये केक कापत होते. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. आयराने ८ मे रोजी तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला आहे. आयराचा केकवर असलेली मेनबत्ती विझवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला फोटो इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत आयरासोबत आमिर दिसत असून त्याचा मुलगा आझाद देखील दिसत आहे. आमिरने मुलीच्या वाढदिवसानिमित्त पूल पार्टीचे आयोजन केल्याचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण यावेळी आयराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. आणखी वाचा : 'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का? आणखी वाचा : अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा पूल पार्टीत आमिर शर्टलेस असल्याचे दिसत आहे. तर आयराचा बिकीनी लोक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नाही असे दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, "हा वाढदिवस आहे की पूल पार्टी." दुसरा नेटकरी म्हणाला, "लाज बाळग आमिर खान. "तिसरा नेटकरी म्हणाला, "हे बाप आणि लेक आहेत. काय ड्रेसअप झाले आहेत. थोडीपण लाज नाही." आणखी एक नेटकरी म्हणाला, "मुलगी किती बेशरम आहे आणि त्याहून जास्त बेशरम बाप आहे."