मला ऑफिसमध्ये काम द्या; आर्थिक संकट कोसळल्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीची आमिर खानकडे मदतीची याचना

तिने चित्रपटात केसरिया ही भूमिका साकारली होती

parveena mujhe apne office main kaam de do, lagaan co star parveena work casting director, lagaan co star parveena suffering stroke, aamir khan lagaan co star parveena seeks help,

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘लगान.’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत अभिनेत्री परवीना दिसली होती. तिने चित्रपटात केसरिया ही भूमिका साकारली होती. आता परवीनावर आर्थिक संकट कोसळले आहे. तिने आमिर खानकडे काम मागितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून परवीना प्रकृतीशी संबंधीत समस्यांना समोरी जात आहे. आता ईटाइम्सशी बोलताना परवीना म्हणाली, ‘माझ्या कुटुंबीयांनी माझी नेहमी मदत केली आहे आणि मित्रांनीदेखील मदत केली. माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईपर्यंत मी आर्थिकदृष्ट्या मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी अनेक प्रोडक्शन हाउसला विनंती केली आहे.’

पुढे आमिर खानकडे मदत मागण्याबाबत ती म्हणाली, ‘मला काम करायचे आहे आणि मी आमिरकडे काम मागितले आहे. त्याला माझ्या प्रकृती विषयी माहिती नाही. जर त्याला माहिती असते तर त्याने माझी मदत केली असती. त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये फक्त काम द्यावे.’असं परवीना म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan lagaan co star parveena seeks help from him avb

फोटो गॅलरी