आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट | aamir khan movie lal singh chaddha box office collection day 3 film earn less than 10 11 crore see details | Loksatta

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे.

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

‘लाल सिंग चड्ढा’बाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांमुळे चित्रपट चालणार का? हा मोठा प्रश्नच होता. आमिरचा चित्रपट म्हटलं की प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पूर्णच घसरला. दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये या चित्रपटाने कमावले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या चित्रपटाचे काही शो रद्द करण्यात आले. चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार ‘लाल सिंग चड्ढा’ने शनिवारी फक्त ९ ते १० कोटी रुपयांची कमाई केली. विकेण्डला तरी हा चित्रपट चांगली कामगिरी करणार असं बोललं जात होतं. पण बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहता चित्रपटाच्या पदरी अपयश आल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. १५ ऑगस्ट आणि विकेण्डचा चित्रपटाला फायदा होईल अशी चर्चा अजूनही सुरु आहे.

आणखी वाचा – “३० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण…” ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत.दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘विठू माऊली’नंतर ‘टकाटक २’ला होकार देण्यामागचे कारण काय? अजिंक्य राऊत म्हणाला “त्यातील बोल्ड दृश्य…”

संबंधित बातम्या

“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
‘RRR’, ‘KGF2’वर भारी पडणार ‘हा’ पाकिस्तानी चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ला देणार टक्कर?
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 1st ODI: रोहित-विराटला बाद करत शाकिबने केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज
चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना
MCD Election : मतदान यादीतून अनेक नावं गायब…;  ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!
Lakshya Sen: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल