“मला भीती वाटते कारण…” महाभारतावर चित्रपट बनवण्याबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा

आमिर खानने महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

“मला भीती वाटते कारण…” महाभारतावर चित्रपट बनवण्याबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
एका मुलाखतीमध्ये आमिरने 'महाभारत' ग्रंथावर पौराणिक चित्रपट बनवण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगमी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’मुळे चर्चेत आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नेहमीच पूर्ण वेळ देऊन कोणताही चित्रपट करताना दिसतो. निवडक चित्रपट करणाऱ्या आमिर खानने १० वर्षांपूर्वी ‘महाभारत’ या पौराणिक ग्रंथावर एक बिग बजेट चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचं हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिरने ‘महाभारत’ ग्रंथावर पौराणिक चित्रपट बनवण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

सध्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आमिरनं या विषयावर चित्रपट तयार करण्याची भीती वाटत असल्याची कबुली एका मुलाखतीत दिली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “जेव्हा तुम्ही ‘महाभारत’ सारख्या विषयावर चित्रपट तयार करत असता तेव्हा तो केवळ चित्रपट नाही तर एक महायज्ञ असतो. चित्रपटापेक्षा जास्त काहीतरी मोठी गोष्ट असते. त्यामुळे मी यासाठी आता अजिबात तयार नाहीये. हे मोठ्या पडद्यावर मांडायची मला अजूनही भीती वाटतेय. ‘महाभारत’ तुम्हाला कधीच निराश करणार नाही मात्र तुम्ही हा विषय हाताळताना काही कारणांनी प्रेक्षकांची निराशा होऊ शकते.”

आणखी वाचा- Koffee With Karan 7: “माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रीणींबरोबर …. “, सोनम कपूरने केली कपूर भावंडांची पोलखोल

याआधी पीटीआयशी बोलताना आमिर खानने ‘महाभारत’ ग्रंथावर चित्रपट तयार करणं हे त्याच्यासाठी एक स्वप्न असल्याचं म्हटलं होतं. आमिर म्हणाला होता, “माझी मनापासून इच्छा आहे. हा एक मोठा प्रकल्प आहे. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण मी तो आज बनवायचा ठरवला तर त्याला पूर्ण होण्यास किमान २० वर्षे लागतील. त्यामुळे जरी हा विषय मला खूप आकर्षित करत असला तरीही मला भीती वाटते की, जर मी यासाठी हो म्हटलं तर त्यावर संशोधन करायलाच मला ५ वर्षे लागतील आणि त्यानंतर चित्रपट तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल.

आणखा वाचा- आमिर खानच्या लाल सिंग चड्ढामध्ये शाहरुख खानची एण्ट्री, या भूमिकेत झळकणार

दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटाचे हक्क मिळविण्यासाठी ८-९ वर्षे लागली असा खुलासा आमिर खानने नुकताच एका मुलाखतीत केला होता. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर खान व्यतिरिक्त करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan reaction about making big budget film on mahabharat mrj

Next Story
“मला खात्री होत नाही तोपर्यंत…” विजय देवरकोंडाशी असलेल्या नात्याबद्दल रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी