“जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर…” ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर स्पष्टच बोलला आमिर खान

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबाबत अभिनेता आमिर खानने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

“जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर…” ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर स्पष्टच बोलला आमिर खान
‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबाबत अभिनेता आमिर खानने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadda) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत आमिरने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये आमिरला ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड आणि तसेच चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांबाबत विचारण्यात आलं. यामुळे आमिरने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

आमिर म्हणाला, “कोणत्याही गोष्टीबाबत मी कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याचं मला दुःख आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही. जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो.” ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाच्या मार्गावर असताना सुरु असलेल्या वादामुळे चित्रपटाला कितपत फटका बसणार हा मोठा प्रश्नच आहे.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “…यामागे आमिर खानच”

“जेव्हा लोक बॉलीवूड आणि ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. खासकरून लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी यासाठी करतात कारण, त्यांच्या मते मला भारत देश आवडत नाही. माझं आपल्या देशावर प्रेम नाही. पण हे सत्य नाही. काही लोकांना असं वाटतं की मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे आणि हे खूपच दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पाहा.” असं आमिरने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…म्हणून बॉलिवूडमधील निर्माते स्त्रीप्रधान चित्रपट बनवत नाहीत”; विद्या बालनचे वक्तव्य चर्चेत
फोटो गॅलरी