Video : मुलाच्या १० व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, आमिर खान आणि किरण राव पुन्हा दिसले एकत्र

यावेळी आमिर खान, किरण राव या दोघांनी एकत्रित आझादसोबत केक कापला.

सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव चर्चेत आहेत. या चर्चा त्या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्या काही महिन्यांपूर्वी विभक्त झाल्यानंतर आमिर आणि किरण पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मुलगा आझादच्या १० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हटके सेलिब्रेशनसाठी ते दोघेही एकत्र आले होते.

आझादच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घरातच छोटेसे सेलिब्रेशन आयोजित केले होते. यावेळी शोभा डे या देखील उपस्थित होत्या. शोभा डे यांनी या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहे. या फोटोत आमिर खान त्याचा मुलगा आझादसोबत क्वॉलिटी टाईम शेअर करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे यावेळी आमिर खान, किरण राव या दोघांनी एकत्रित आझादसोबत केक कापला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान आझादने बऱ्या महिन्यानंतर आई-वडिलांना एकत्रित बघितल्यावर त्याला फार आनंद झाला आहे.

दरम्यान आमिर सध्या त्याचा आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रतिक्षा करत आहे. येत्या १४ एप्रिल २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्यही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan reunites with ex wife kiran rao to celebrate son azad birthday nrp