scorecardresearch

Video: आमिर खान दिसला एक्स वाइफ किरण रावसोबत, नेटकरी संतापले

‘घटस्फोट घेतला आहे की मस्करी केलीय’, असे एका नेटकऱ्याने म्हणत सुनावले आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खानने दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट दिला. त्यानंतर तो फातिमा सना शेखला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसोबत दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा फिल्मी ज्ञान या पेजने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो किरणसोबत बोलताना दिसत आहे. दरम्यान, किरणने ब्लॅक टॉप आणि जीन्स परिधान केला आहे तर आमिर खानने हुडी घातला आहे. दोघेही एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

एका यूजरने, ‘एक्स वाइफ आता मैत्रीण झाली… वाह..’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘यांचा खरच घटस्फोट झाला आहे की मस्करी केलीय’ असे म्हणत आमिर आणि किरणला सुनावले आहे.

आमिर आणि किरणने स्टेटमेंट जारी करत विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. ” १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असे आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan seen with ex wife kiran rao fans give reactions watch viral video avb

ताज्या बातम्या