आमिर खानचं तिसरं लग्न खरंच होणार की…?; समोर आली नवी माहिती

येत्या काही दिवसात आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर हा लवकरच तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच आमिर खानच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या अवघ्या काही महिन्यानंतर आता आमिर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या काही दिवसात आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत तो लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. फातिमाने आमिरसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात काम केले आहे. किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानतंर आमिर हा फातिमासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरुन आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

मात्र आता आमिरने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना आमिरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, “आमिर खान तिसरं लग्न करणार असल्याची बातमी पूर्णत: चुकीची आणि खोटी आहे. आमिर तिसरे लग्न करण्याच्या कोणत्याही विचारात नाही. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत,” असे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा आगामी चित्रपट २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan to tie the knot third time fake news going viral know latest reports nrp