म्हारी छोरियाँ छोरों से कम है के? ‘दंगल’चा नवा पोस्टर प्रदर्शित

आज सर्व क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय.

त्या शुक्रवारी २३ डिसेंबरला मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान, फातिमा सना शेख आणि सानिया मल्होत्रा यांचा 'दंगल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ या चित्रपटाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर ‘दंगल’ हा चित्रपट आधारित आहे.
आमिर खानने ट्विटरवरून ‘दंगल’चा नवा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये महावीर फोगट यांच्या भूमिकेतील आमिर आणि चित्रपटात त्यांच्या मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्रींची झलक दिसते. आज सर्व क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. ती कुठेही कमी पडत नाही. मुलांपेक्षा मुली या कधीच कमी नसतात, हाच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘म्हारी छोरियाँ छोरों से कम है के?’ अशी टॅगलाइन देण्यात आलेली आहे. आमिरचा हरयाणवी लूकही आपल्याला यात पाहावयास मिळतोय. फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा या गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्या भूमिकेत चित्रपटात दिसतील. आमिरचा ‘दंगल’ आणि सलमानचा ‘सुलतान’ हे दोन्ही चित्रपट कुस्तीपटूंवर आधारित असल्यामुळे या चित्रपटांमध्ये साम्य असल्याची चर्चा होती. पण ‘दंगल’चे दोन्ही पोस्टर पाहता हा चित्रपट सुलतानपेक्षा नक्कीच वेगळा असेल असे म्हणायला हरकत नाही.
नितेश तिवारीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aamir khan tweeted dangals new poster