महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते. जिनिलियाने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने काही काळासाठी या सर्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर अखेर तब्बल १० वर्षांनी जिनिलिया मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे यासोबत तिने अनेक चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात जिनिलिया ही बॉलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार आहे.

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात जिनिलियाने आदिती ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर या चित्रपटाच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात जिनिलियासोबतच बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान झळकणार आहे.

वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

मिळालेल्या माहितीनुसार, ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे जिनिलियाने आमिर खानचे मन जिंकले होते. यानंतर आता जवळपास १५ वर्षांनंतर जिनिलिया देशमुख आणि आमिर खान पुन्हा एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे आमिर खान हा जिनिलियाोबत या चित्रपटात काम करण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे जिनिलियाची सिनेसृष्टीत खास ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे आता याच चित्रपटाच्या सिक्वलद्वारे आमिर खान हा जिनिलियाला पुन्हा एकदा लाँच करण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी त्या दोघांनी यासंदर्भात भेट घेतल्याचे बोललं जात आहे. या दोघांनीही याबाबत होकार दर्शवला आहे. त्यामुळे लवकरच जिनिलिया ही पुन्हा एकदा आमिर खानच्या प्रोडक्शनसोबत काम करणार आहेत.

“वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण…”, मिस युनिव्हर्स हरनाझ संधूला झालाय ‘हा’ गंभीर आजार

रितेश आणि जिनिलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. जिनिलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.