काही दिवसांपूर्वी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये नव्या पर्वाची थीम काही प्रमाणामध्ये जाहीर करण्यात आली. सोशल मीडियावर हा प्रोमो व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला. या कार्यक्रमाचे नवे पर्व थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभाग घेणार आहेत या विषयावर सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान आमिर खानच्या भावाच्या भावाला फैजल खानला नव्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची बातमी समोर आली आहे.

आमिर खानचा भाऊ फैजल खान देखील अभिनयक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्याने ‘मधहोश’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मेला’ या चित्रपटामुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली. फैजलने ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिंकदर’ या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याला आमिरप्रमाणे या क्षेत्रामध्ये यश मिळाले नाही. सलग चित्रपट फ्लॉप होत गेल्याने तो चित्रपटसृष्टीच्या बाहेर गेला. फैजल खान सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने मध्यंतरी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये फैजलला बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी विचारले असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्याने या बहुचर्चित शोमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला असल्याचेही स्पष्ट केले.

Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी
ss-rajamouli-earthquake
जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यातून ‘असे’ बचावले एसएस राजामौली; दिग्दर्शकाच्या मुलाने सांगितला किस्सा

टाईम्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फैजल खान म्हणाला की, “बिग बॉसच्या घरात सगळे एकमेकांशी सतत भांडत असतात. त्यांनी दिलेल्या टास्कमुळे त्यांच्यात भांडणे होतात. या खेळात ते तुमच्या मनाशी खेळतात. मला अशा जागी अडकायचे नाहीये. त्यांनी मला पैसेसुद्धा ऑफर केले, पण अल्लाच्या कृपेने माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत. त्यामुळे मी स्वत:हून या मायाजाळात का अडकू? कोणाला बंदिस्त राहायला आवडतं? प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. बंदिस्त असताना मजा येत नाही. मला एकदा आमिरच्या घरामध्ये कोंडण्यात आलं होते. मला पुन्हा तो अनुभव नकोय”

आणखी वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर

२००७-०८ मध्ये फैजल खानने न्यायालयात त्याच्या कुटुंबाविरोधात खटला दाखल केला होता.