अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटांद्वारे नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असतो. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देणारा आमिर सध्याही गाजतोय तो म्हणजे त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे. चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या प्रसिद्धीचे महत्त्व जाणत अभिनेता आमिर खानने कधीही त्याच्या चाहत्यांना निराश केलेले नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटात अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये आमिर महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेतही वयाच्या विविध टप्प्यांमध्ये दिसणार आहे. आमिर त्याच्या भूमिका साकारण्यासाठी ज्या तत्परतेने काम करतो आणि ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखांना तो पडद्यावर जिवंत करतो त्या अर्थी त्याला बहुरुपी म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही.

dangal, aamir khan

कधी पोलीस ऑफिसर, कधी एलियन तर कधी चक्क कुत्र्याच्या आवाजाद्वारेही आमिर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. होय….कुत्र्याच्या आवाजात. झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात एका श्रीमंत कुटुंबातील नात्यामध्ये असणारा असमतोल आणि त्यामुळे होणारी घालमेल यांचे चित्रण करण्यात आले होते. तऱ्हेवाईक व्यक्तिरेखा साकारत या चित्रपटातून अभिनेता अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रणवीर सिंग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या कलाकारांनी साकारलेल्या मेहरा कुटुंबाच्या या गर्दीत आणखी एक सदस्य होता तो म्हणजे त्यांचा कुत्रा, प्लुटो. या कुटुंबामध्ये उडालेली तारांबळ पाहता चक्क हा प्लुटो देखील बोलत होता. ‘दिल धडकने दो’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या बोलक्या कुत्र्याला आवाज दिला होता परफेक्शनिस्ट आमिर खानने. त्यामुळे आमिरच्या आवाजामुळे पडद्यावर या बोलक्या आणि हुशार कुत्र्याने अनेकांचेच लक्ष वेधले होते.

dil dhadakne do

‘पीके’ या चित्रपटामध्ये आमिरने एका एलियनची भूमिका साकारली होती. राजकुमार हिरानींच्या या चित्रपटाद्वारे आमिरने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर त्याचे परफेक्शन सिद्ध केले होते असेच म्हणावे लागेल.

pk

आमिरची आणखीन एक अतरंगी भूमिका प्रेक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधून आमिरच्या अतरंगी अवताराची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यामध्ये आमिर लाल रंगाच्या गंजीमध्ये दिसत असून हातात अंगठ्या घालून दिसतस आहे. केसांचा उभा तुरा आणि आमिरच्या चेहऱ्यावरील भाव पाहता या चित्रपटातून काहीतरी खास पाहायला मिळणार असेच दिसतेय.

aamir

‘डेली बेल्ली’ या चित्रपटात आमिर चक्क एका आयटम साँगवर थिरकला होता. या गाण्यावर आमिरचे नृत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

20aamir-khan7
‘गजनी’ या चित्रपटातही आमिरने एक व्यावसायिक जितक्या प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर उभा केला होता त्याचप्रमाणे त्याने त्याच्या भूमिकेची दुसरी बाजूही त्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडली होती.

20aamir-khan6

एका क्रांतिकारी भूमिकेद्वारे आमिर ‘मंगल पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मंगल पांडेंची ही भूमिका साकारत आमिर एका वेगळ्याच लूकमध्ये पडद्यावर झळकला होता. फक्त याच चित्रपटांमध्ये नाही, तर ‘लगान’, ‘फना’, ‘रंग दे बसंती’ आणि अशा विविध चित्रपटांतून आमिरने भूमिका साकारत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.

20aamir