‘मला तुझी मदत…’, स्नेहा वाघ आणि पूर्वाश्रमीचा पती अविष्कारमधील संवाद चर्चेत

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये सहभागी झाली आहे. याच शोमध्ये स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता अविष्कार दार्वेकरही स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. बऱ्याचदा अविष्कार आणि स्नेहा एकमेकांशी बोलणे टाळत असतात. पण नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अविष्कार आणि स्नेहा यांच्यामध्ये संवाद झाल्याचे दिसले. दरम्यान स्नेहाने ‘मला तुझ्या मदतीची गरज नाही’ असे अविष्कारला म्हटले आहे.

बिग बॉस मराठी सिझन ३च्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये अविष्कार आणि स्नेहा बोलत होते. जेव्हा अविष्कारने स्नेहाला आपण एकमेकांशी न बोलून काय होणार आहे असे म्हटले. त्यावर स्नेहाने बिग बॉसच्या घरात आपल्यात मैत्री होईल अशी अपेक्षाही करु नकोस असे स्पष्ट सांगितेल आहे.
आणखी वाचा : शाहरुखने दिलेले ४५०० रुपये आर्यन खानने जेलमध्ये कसे केले खर्च? जाणून घ्या

त्यानंतर अविष्कार स्नेहाच्या करिअरविषयी बोलताना दिसत आहे. ‘तू तुझे करिअर ज्या पातळीवर नेले आहेस त्या बद्दल खरच सलाम. जर कधीही तुला माझी गरज भासली, ती नाहीच भासणार पण मी नक्की मदत करेन. मला तुला मदत करताना आनंद होईल’ असे अविष्कार म्हणाल. ते ऐकून लगेच स्नेहा म्हणाली की माझ्या कुटुंबीयांनी मला कायम पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच माझे करिअर आज इथपर्यंत पोहोचले आहे. तसेच पुढे तिने मला तुझ्या मदतीची गरज कधीही लागणार नाही असे म्हटले. दरम्यान, या पुढे याविषयावर कधीही बोलू नकोस असे स्नेहा म्हणाली.

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये स्नेहाने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचे कारणदेखील सांगितले होते.‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेतून स्नेहा घराघरात पोहचली तर ‘ज्योती’ सह अनेक हिंदी मालिकांमधून देखील स्नेहा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aavishkar darwhekar praises ex wife sneha wagh for building a career in the industry avb

ताज्या बातम्या