छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच ‘बिग बॉस’मधून अभिजित बिचुकले बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर अभिजितने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानविरोधात संताप व्यक्त केला होता. आता अभिजितने आपल्या राज्यात सुरु होणाऱ्या ‘वॉक इन स्टोअर’ या गोष्टीचा विरोध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजितने नुकतीच एक मुलाखत दिली असून यावेळी त्याने याचा विरोध केला आहे. “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे आचार आणि विचार विसरू नका आणि लोकांना त्यासोबत तरूणपिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये आणि मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याच मी कधीही समर्थन करणार नाही. यामुळेच मी त्यांना काल सल्ला दिला होता की, जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजीत बिचुकले अॅण्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत ते द्या, कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून माणसांना ताकद मिळेल आणि येणारी पिढी सुद्रुढ होईल,” असं अभिजीत म्हणाला.

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “एक दिवस रात्री ३ वाजता रस्त्यावर एकटी…”, अक्षयसोबत ब्रेकअपनंतर काय घडले? रवीनाने केला खुलासा

उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे आचार आणि विचार विसरू नका आणि लोकांना त्यासोबत तरूणपिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये आणि मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याच मी कधीही समर्थन करणार नाही. यामुळेच मी त्यांना काल सल्ला दिला होता की, जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजीत बिचुकले अॅण्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत ते द्या, कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून मानसांना ताकद मिळले आणि येणारी पिढी सुद्रुढ होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijit bichukale uddhav thackeray balasaheb thackeray wine sale in supermarket maharashtra government dcp
First published on: 02-02-2022 at 13:18 IST