अमिताभ बच्चन यांच्या कौतुकानंतर अभिषेकची प्रतिक्रिया म्हणाला, “मला आता भीती वाटतेय कारण…”

“त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा आहे,” असे अभिषेक म्हणाला.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेचे सर्वचजण कौतुक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकचे कौतुक केले आहे. दरम्यान यावर अभिषेकला विचारले असता तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला कोणत्याही परिस्थितीत मोडायचा नाही,” असे त्याने सांगितले.

अभिषेक बच्चनने नुकतंच मिड डे वृत्तपत्राशी बोलताना ‘बॉब बिस्वास’चित्रपटाबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला, “मी भारावलो होता, भारावलो आहे आणि यापुढेही असेन. मी त्यांचा मुलगा आणि सर्वात मोठा चाहता आहे. तुमच्या सर्वात आदर्श व्यक्तीला कामाची जाणीव असणे, त्यांनी तुमचे काम पाहणे हीच एक कौतुकाची थाप आहे. जर तुम्ही चांगले काम करत असाल तर ते तुम्हाला एकटं सोडतात आणि त्यांना वाटते की मी चांगले काम करत आहे, असे त्याने सांगितले.

“बॉब बिस्वास’ या चित्रपटाकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. त्यांचा अपेक्षांचा भंग कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, असे मला वाटते. माझ्या वडिलांनी माझे कौतुक केले याचा मला निश्चितच आनंद आहे. पण मी थोडा घाबरलो आहे. त्यांनी ट्रेलर पाहिला आणि त्यानंतर त्याबद्दल काहीतरी लिहिले हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. यामुळेच मला आता भीती वाटत आहे. कारण हा चित्रपट उत्तम असावा अशी माझी इच्छा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून बिग बींनाही अपेक्षा आहेत. त्यांचा अपेक्षांचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा आहे,” असे अभिषेक म्हणाला.

हेही वाचा : ब्रेकअपनंतर मी अनेक महिलांसोबत सेक्स केला आणि त्यामुळे…; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटाच्या दोन मिनिटे एकोणचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वासचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येतो आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्याला त्याचे कुटुंबीय तसेच भूतकाळाविषयी काही माहिती नसते. तो खरच सगळं विसरला आहे की त्यामागे काही कारण आहे हे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhishek bachchan does not want dad amitabh bachchan hopes to come crashing down with bob biswas nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या