सौंदर्य पाहून नाही तर ‘या’ कारणामुळे अभिषेकने केले ऐश्वर्याशी लग्न

अभिषेकने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

abhishek bachchan, aishwarya rai,
अभिषेकने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. त्या दोघांमध्ये कधीच ही गोष्ट आली नाही. एवढचं काय तर ऐश्वर्याची सुंदरता ही कोणाला ही घायळ करणारी आहे. मग अभिषेकनेही तिच्याशी या मुळेच लग्न केले असणार अशा चर्चा त्यांच्या लग्ना दरम्यान रंगल्या होत्या. मात्र, अभिषेकने तिच्याशी सुंदरतेमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे केल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळीच त्याने ऐश्वर्याशी लग्न का केलं ते सांगितलं आहे. “ती खूप सुंदर आहे. फक्त एवढचं नाही तर ती एक सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. तिचे मन साफ आहे आणि हेच तिचे सौंदर्य आहे. तर याच कारणामुळे मी ऐश्वर्याशी लग्न केले आणि तिला जीवनसाथी म्हणून निवडले”, असे अभिषेक म्हणाला.

अभिषेक म्हणाला, “व्यक्तीचे सौंदर्य हे ठराविक काळापर्यंत असते. परंतु एक स्वच्छ आणि सुंदर मन हे नेहमी त्या व्यक्तीसोबत असते. याच कारणामुळे बाह्य सुंदरतेवर प्रेम करू नका, तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवर करा. तुमचा जोडीदार हा फक्त सुंदर असला पाहिजे अस तुम्ही म्हणत असाल तर पुढे जाऊन ही मोठी चुक ठरू शकते. कारण जोडीदारासोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहेत. त्यामुळे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असणे गरजेचे आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhishek bachchan revealed secrets about his marriage dcp

Next Story
“देशातली सर्वात शक्तिशाली महिला”, कंगना रनौतनं स्वत:लाच दिली उपाधी!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी