scorecardresearch

दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर अभिषेक बच्चनने केले वक्तव्य, म्हणाला…

अभिषेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.

abhishek bachchan, abhishek bachchan on south movie remake,
अभिषेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.

सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ‘बाहुबली’ नंतर ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांनी सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षक पसंती देतात. यामुळे मुंबईतील चित्रपट निर्मात्यांवरही टीका होत आहे. आता यावर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेकने नुकतीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. त्यावेळी अभिषेक म्हणाला, “तुम्हाला असं म्हणायचयं की दक्षिणेत हिंदी चित्रपटांचा रिमेक होत नाही? हा प्रश्नच चुकिचा आहे, कारण तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. आपण सगळेच भारतीय चित्रपट इंडस्ट्रीचा भाग आहोत. आपण फक्त वेगवेगळ्या भाषेत काम करतो. आमचे प्रेक्षकही तेच आहेत. कोणत्याही चित्रपटसृष्टीवर लेबल चिटकवणं चुकीचं आहे. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांचे रिमेक केले जातात हे काही नवीन गोष्ट नाही. या आधी देखील अनेक वेळा चित्रपटांचे विषय एक्सचेंज झाले आहेत आणि त्यात काहीही चूक नाही.”

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

अभिषेक पुढे नुकत्याच हिट झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे उदाहरण देत म्हणाला, “सध्या हे चित्रपट खूप चांगली कमाई करत आहेत. पण त्यांनी या आधीही चांगली कमाई केली आहे. आमचे चित्रपट दक्षिणेत चालतात. हा काही नवा ट्रेंड नाही. जर आमचे कुटुंब खूप मोठे आहे, तर सिनेमाचे विषय हे एक्सचेंज होणारच. याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे कल्पना नाही आहेत. पण एक क्रिएटर म्हणून ती आमची एक चॉइस आहे.”

आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

अभिषेक नुकताच दसवी या चित्रपटात दिसला. त्याचा हा चित्रपट ७ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत यामी गौतम आणि निम्रत कौरही दिसल्या होत्या. सध्या अभिषेक त्याच्या ‘SSS-7’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhishek bachchan says remaiking south movies in bollywood is our choice dcp