बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अद्याप विविध कारणांमुळे तो चर्चेत असतो. त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. सिनेसृष्टीत ‘काइ पो चे’ या चित्रपटामुळे सुशांतला नवीन ओळख मिळाली. हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. सुशांतला प्रसिद्धीझोतात आणणाऱ्या या चित्रपटाला नुकतंच ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्याचे अनेक चाहते सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचे निर्माते अभिषेक कपूर यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

चित्रपट निर्माते अभिषेक कपूर हे त्यांच्या चित्रपटातून नेहमीच काही ना काही संदेश देताना दिसतात. ‘काइ पो चे’, ‘केदारनाथ’ आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘चंदीगढ करे आशिकी’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच चर्चेत होते. सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका असणारा ‘काइ पो चे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ९ वर्ष उलटली होती. मात्र या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण या सर्वांचे विशेष कौतुक पाहायला मिळेल.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

दरम्यान ‘काइ पो चे’ या चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिषेक कपूरने काही आठवणी ताज्या केल्या आहेत. “रॉक ऑन’ या चित्रपटानंतर ‘काइ पो चे’ हा चित्रपट माझ्या चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. नवीन चेहऱ्यांमुळे चर्चेत राहिलेला आणि संवेदनशील मुद्द्यावर आधारित असलेला हा चित्रपट हाती घेणे खूप आव्हानात्मक होते”, असे अभिषेक कपूर म्हणाला.

“मात्र त्याने माझ्यातील कथाकाराला तयार केले. त्याला एक समाधान दिले. गेल्या अनेक वर्षांपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर कोरला गेला आहे, हे पाहणे माझ्यासाठी फारच आनंददायी आहे. या गोष्टींमुळे माझ्या प्रत्येक प्रकल्पात मी मर्यादांना आव्हान देत राहण्याचा माझा विश्वास निश्चितच वाढला”, असेही त्याने म्हटले.

“यंदा विसरणार नाही…”, लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी अजय देवगणने केली अनोखी युक्ती

काही दिवसांपूर्वी अभिषेकचा ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा फटका या चित्रपटाला बसला.