सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अखेर पार पडला. मात्र ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक घटनाही समोर आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार विजेता अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर विल स्मिथकडून त्याचा ऑस्कर काढून घेतला जाऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे.

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जात आहे. इतक्या वर्षाच्या अथक मेहनतीनंतर अखेर यंदाच्या वर्षी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. विल स्मिथला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान विल स्मिथने या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या क्रिस रॉकला कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
pune sex racket marathi news, hinjewadi sex racket
पुणे: आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘डय़ून’ चित्रपटाला ६ ऑस्कर, कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मात्र भंगले

क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली. सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण नंतर काही व्हिडीओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता विल स्मिथला त्याचे हे कृत्य भोवणार असल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्कमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विल स्मिथला त्याचा ऑस्कर परत द्यावा लागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर अकादमीनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

अकादमीचा नियम काय?

ऑस्कर पुरस्कार हा अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे प्रदान केला जातो. The Academy of Motion Picture Arts and Sciences च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या प्रकरणानंतर अकादमीने ट्विट करत यावर स्पष्टीकरणही दिले आहे. “अकादमी कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराला माफ करत नाही. असे ट्वीट अकादमीने केले आहे.

विश्लेषण : पत्नीचे नाव घेताच ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने क्रिस रॉकला कानाखाली का मारली? जाणून घ्या…

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, जेव्हा विल स्मिथने क्रिस रॉकवर हात उचलला, त्यानंतर प्रत्येकाला धक्का बसला. अनेकजण या घटनेने अस्वस्थ झाले आहेत. या कृत्यानंतर त्याला त्याचा पुरस्कार परत करण्यास सांगितला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. तर दुसरीकडे विल स्मिथ मात्र हा पुरस्कार परत करण्यास नकार देऊ शकतो, असेही बोललं जात आहे. दरम्यान यानंतर आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.