"आधी मिठीत घेतलं, गाडीकडे नेलं अन्..." शमिता शेट्टीबरोबर प्रसिद्ध अभिनेत्याने केलेल्या 'त्या' कृतीवर नेटकरी संतप्त spg 93 | actor aamir ali pulled shamita shetty and drop down to her car viral video | Loksatta

Video : “आधी मिठीत घेतलं, गाडीकडे नेलं अन्…” शमिता शेट्टीबरोबर प्रसिद्ध अभिनेत्याने केलेल्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी संतप्त

राकेश आणि शमिताच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

shamita shetty
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शामिता शेट्टी हीदेखील अभिनेत्री आहे. मोजक्याच चित्रपटातून तिने अभिनय केला आहे, मात्र ती विशेष छाप पडू शकली नाही. अभिनेता राकेश बापट बरोबरच्या प्रेम प्रकरणामुळे ती चर्चेत आली होती. नुकतीच ती एका पार्टीत दिसली मात्र तिने लक्ष वेधून घेतले ते एका कृतीने, तिच्याबरोबर एक टीव्ही अभिनेतादेखील होता.

अलीकडेच शमिता शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पार्टीतून बाहेर पडत होती, पण अचानक टीव्ही अभिनेता आमिर अलीने तिला आपल्या मिठीत धरले आणि फोटोग्राफरच्या कॅमेरांपासून वाचवत तिला तिच्या गाडीपर्यंत नेले. आमिरला अचानक पाहून शमिताही थोडी घाबरली. शमिताला कारमध्ये उतरवल्यानंतर आमिरने तिचा निरोप घेतला. शमिता शेट्टीच्या या व्हिडिओवर लोक सतत कमेंट करत आहेत.

Photos : दाक्षिणात्य चित्रपटात ही उर्वशी रौतेलाची क्रेझ; ३ मिनिटांच्या आयटम सॉंगसाठी घेतले ‘इतके’ कोटी

काही लोकांना आमिरचे हे वागणे थोडे विचित्र वाटले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने लिहले आहे “हिला खूप ऍटिट्यूड आहे” तर दुसऱ्याने लिहले आहे “यांचे काहीही चालू असते.” तर आणखीन एकाने लिहले आहे “यांना काहीच वाटत नाही का?” अशा शब्दात लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शमिता नुकतीच ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. तसेच तिने झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या शोमध्येही काम केले आहे. लवकरच तिचा ‘द टेनंट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:54 IST
Next Story
नवाजुद्दीन सिद्दीकी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज; या दिग्गज कलाकारांबरोबर करणार काम