राज्यात सध्या करोनाच्या संकटामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातच आरोग्य सुविंधावर पडणारा ताण यामुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सध्याच्या या परिस्थितीत अनेक जण सरकार, राजकारणी आणि स्थानिक नेत्यांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित करत टीका करत आहेत. अशात अभिनेता आस्ताद काळे याने देखील सरकारवर टीका केली आहे.

अभिनेता आस्ताद काळे हा त्याच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेकदा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून परखडपणे त्याचं मत मांडत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकारणी यांना सवाल केला होता. त्यानंतर आता आस्तादने स्थानिक नगरसेवकांना टोला लगावला आहे.

आस्तादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला, “आत्ता महाराष्ट्रातील ‘नगर”सेवकां”‘चा पगार (सरकारी पगार) हा फारफारतर रुपये २५०००/- इतका आहे. A grade Municipal Corporation मधल्यांचा. ज्यात पुणे, मुंबई, आणि नागपूर येतात. आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलोय. २५००० रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!! Fortuner चा हफ्ताच ३००००/- वगैरे असेल!!(जर द्यायचा असेल तर अर्थात!!)” आस्तादने त्याच्या या पोस्टमधुन नगरसेवकांच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आस्तादची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश’, आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

ही वेळ एकत्र येण्याची

आस्तादने ‘चला प्रश्न विचारूया’ ही मोहीमच हाती घेतली आहे. यात त्याने जर नगरसेवकांना सरकारी पगारच 25 हजार रुपये आहे तर ३० हजार गाडीचा हफ्ता भरणं परवडण्यासारखं नाही असं म्हणत टोला लगावला आहे. अस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. प्रश्न लाख विचारले तरी उत्तर मिळतील का? अशी कमेंट एका युजरने केली आहे. यावर आस्ताद म्हणाला, “मिळतील. खरंच लाखोनी विचारले प्रश्न, एक होऊन विचारले, तर मिळतील. पण त्या आधी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. जात/धर्म/पंथ/भाषा/प्रांत हे सगळं सोडून Taxpayer /करदाता, म्हणजेच लोकशाहीचा एक अतिशय महत्तवाचा घटक म्हणून एक व्हयला हवं.” असं तो म्हणाला.

अस्तादच्या या पोस्टनंतर त्याच्या मताशी सहमत होतं अनेकांनी आता एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय