एकापाठोपाठ चार चित्रपट सुपरफ्लॉप, आता ओटीटीवर प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा नवा चित्रपट, पाहा टीझर

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

एकापाठोपाठ चार चित्रपट सुपरफ्लॉप, आता ओटीटीवर प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा नवा चित्रपट, पाहा टीझर

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ चित्रपट गेल्याच आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला. ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ हे त्याचे तिन्ही चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. असं असताना आता त्याचा नवा चित्रपट चक्क ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

आणखी वाचा – चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”

अक्षयचे एकामागोमाग एक चित्रपट सुपरफ्लॉप ठरत असले तरी तो खचला नाही. पण आता त्याचा नवा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलं आहे. ‘कठपुतली’ (Cuttputlli) या त्याच्या आगामी चित्रपटाची आता घोषणा झाली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रकुल प्रीत सिंग या चित्रपटात अक्षयबरोबर काम करताना दिसणार आहे.

पाहा टीझर

चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. तसेच चित्रपटाचा टीझर पाहता हा क्राईम थ्रीलर चित्रपट असल्याचं चित्र दिसत आहे. सीरियल किलरला योग्य तो धडा शिकवण्यासाठी अक्षयची चाललेली धडपड या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ‘रत्सासन’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

आणखी वाचा – “सुप्रसिद्ध कलाकार माझ्याबरोबर…” सनी लिओनीचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, काम मिळत नसल्याची खंत

‘रत्सासन’मध्ये विष्णु विशाल आणि अमला पॉल हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारी यांनी केलं आहे. येत्या २ सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरी अक्षयच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor akshay kumar cuttputlli movie teaser out film release on ott platform see video kmd

Next Story
अभिनेता सलमान खानचा नवा ‘भाईजान’ लूक व्हायरल : चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी