Allu Arvind Advice Mrunal Thakur To Marry In Telugu Industry : मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘डकैत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अन्नपूर्णा स्टुडिओजने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांत जगभरात ४० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला दिग्दर्शक नाग अश्विन आणि प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नाग अश्विन यांनी मृणालचे कौतुक करताना तिची तुलना मधुबाला आणि स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्रींशी केली.
नाग अश्विन म्हणाले, “मृणाल, तू एक अप्रतिम अभिनेत्री आहेस. जेव्हा तू एखादी भूमिका करतेस, तेव्हा मला वाटते की तू यापेक्षा खूप चांगल्या भूमिकांसाठी बनली आहेस. ज्या पात्रांमध्ये दुःख किंवा वेदना असते, अशा भूमिका तू ज्या ताकदीने साकारतेस. ते पाहून मला मधुबाला आणि स्मिता पाटील यांच्या काळातील अभिनेत्रींची आठवण येते. सध्या तुझ्यासारख्या मोजक्याच अभिनेत्री आहेत, त्यामुळे तू चांगल्याच संहिता निवड.”
Actress #Mrunal, you are like the era of #Madhubala and #SmitaPatil. There are not many like you… so please don’t do random stuff.”
— Milagro Movies (@MilagroMovies) April 12, 2026
: – Director #NagAshwin pic.twitter.com/weEQgm6oz7
याच कार्यक्रमात ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी मृणालला लग्नाबद्दल सल्ला दिला. तिने तेलुगू इंडस्ट्रीतल्याच कुणाशी तरी लग्न करावे असे सांगितले. “माझी अशी इच्छा आहे की, तू तेलुगू इंडस्ट्रीतल्याच कोणाशी तरी लग्न कर आणि इथेच स्थायिक हो. तुला आमच्या जवळ ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि आम्हाला तू इथेच हवी आहेस,” असं ते म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तर मृणालदेखील लाजली.
#AlluArvind to #MrunalThakur:
— Pan India Review (@PanIndiaReview) April 12, 2026
“I think you should MARRY someone from TFI and SETTLE here.”
Is Mrunal Thakur dating someone from TFI !? pic.twitter.com/1MqULPwOeC
मृणाल ठाकूर सध्या ‘डकैत’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’मधून तिला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली. नंतर ‘सीता रामम्’ या तेलुगू चित्रपटाने तिचे नशीब पूर्णपणे बदलले. त्यानंतर अभिनेता नानीबरोबरच्या तिच्या ‘हाय नन्ना’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. याच यशाच्या जोरावर तिला ‘कल्की २८९८ एडी’मध्ये छोटी; पण महत्त्वाची भूमिका मिळाली.
मृणालने २०१२ मध्ये छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. टीव्ही मालिकांमध्ये काम करत असतानाच तिने मराठी चित्रपटांतूनही स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून तिचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले. आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मृणाल सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
