अभिनेता अन्नू कपूर रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर | Actor Annu Kapoor hospitalised health update chest pain rmm 97 | Loksatta

अभिनेता अन्नू कपूर रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

annu kapoor

बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नू कपूर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे.

६६ वर्षीय अन्नू कपूर हे एक अभिनेता, गायक, रेडिओ जॉकी आणि टेलिव्हिजन होस्ट आहेत. त्यांनी १०० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. मागील ४० वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध श्रेणींसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या १९७९ सालच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात अन्नू कपूर पहिल्यांदाच दिसले होते. त्यानंतर त्यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर”मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 22:56 IST
Next Story
Video: प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवं देशभक्तीपर गीत प्रदर्शित, व्हिडीओ व्हायरल