करोना काळात सगळ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य प्राणिसंग्रहालय झेडएकेला आर्थिक तडाखा बसला होता. आता दाक्षिणात्य अभिनेता दर्शन थुगुडेपाने कर्नाटकातील प्राणिसंग्रहालय झेडएके कडून त्याच्या चाहत्यांना आणि प्राणी प्रेमींसाठी एक आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात फक्त देणग्या आणि प्राण्यांना दत्तक घेतल्याने त्या निधीतून एक कोटी रुपयांच्यां आसपास त्यांनी पैसे जमवले आहेत.

आणखी वाचा : “शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं..”, पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने सोडलं मौन

झेडएकेने ५ ते १० जून या कालावधीत तब्बल १ कोटी ४७ हजार रुपये जमा केले आहेत, ही संख्या २९ जुलै २०२० ते ४ जून २०२१ पर्यंत जमा झालेल्या १७ लाख ९६ हजार रुपयांच्या अगदी उलट आहेत. ही वाढ ५५९ टक्क्यांनी वाढली आहे.


दर्शन थुगुडेपानेचा हा व्हिडीओ झू कर्णाटकाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “संपूर्ण राज्यात असलेल्या नऊ प्राणिसंग्रहालयात जवळपास ५ हजार प्राणी आहेत. तर करोनाच्या संकटांचा त्यांच्या जीवनावर परिणाम होतं आहे. लोक प्राणीसंग्रहालयातील पशुंसाठी काही पैसे दान करू शकतात किंवा त्यांना दत्तक घेऊन त्यांचा वार्षिक खर्च आणि त्यांच्या खाण्यापिण्या खर्च देऊ शकतात, एवढंच नाही तर त्यांचा सांभाळ करणाऱ्याला ही पैसे द्यावे लागतील,” असे दर्शनने सांगितले.

आणखी वाचा : “चाहत्यांकडून पहिल्या सारखे प्रेम मिळतं नाही..”, अमिताभ यांनी थ्रोबॅक फोटो शेअर करत व्यक्त केली खंत

उपेंद्र हा देखील एक दाक्षिणात्य अभिनेता आहे. उपेंद्रने म्हैसूरमधील श्री चमराजेंद्र प्राणीशास्त्र बागेतील आफ्रिकन हत्तीला दत्तक घेतले आहे. त्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली. “चॅलेंजिंग स्टार दर्शनने सांगितल्याप्रमाणे आम्ही आफ्रिकन हत्तीला दत्तक घेतले आहे आणि त्यांच्या या कार्यात मदतीचा हात पुढे केला आहे,” असं उपेंद्र म्हणाला.