scorecardresearch

Video : रुग्णालयातून घरी परतलेल्या धर्मेंद्र यांचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाले “पुन्हा असं काही…”

रुग्णालयातून घरी परतलेल्या धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

dharmendra, dharmendra health update, dharmendra hospitalized, dharmendra video, धर्मेंद्र हेल्थ अपडेट, धर्मेंद्र व्हिडीओ, धर्मेंद्र, अभिनेता धर्मेंद्र रुग्णालयात, धर्मेंद्र प्रकृती
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

मागच्या चार दिवसांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यायाम करत असताना धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पण आता रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलाताना दिसत आहेत. ते म्हणाले, “मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी जे केलं त्याचा परिणाम मला सहन करावा लागला आहे. पाठीवरची एक मांसपेशी खेचली गेल्यानं मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या ४ दिवसांमध्ये मला बराच त्रास झाला. पण आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादांमुळे मी ठीक आहे आणि घरी परतलो आहे. काळजी नसावी. यापुढे मी असं काहीच करणार नाही. काळजी घेईन.” धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेता धर्मेंद्र यांचं नाव नेहमीच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. त्यांनी १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘सत्यकम’ आणि ‘सीता और गीता’ यांसारखे काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आगामी काळात ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आजमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor dharmendra got discharge from hospital shared video goes viral mrj

ताज्या बातम्या