scorecardresearch

“कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य

कन्नड चित्रपटसृष्टीबाबत दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे.

“कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य
कन्नड चित्रपटसृष्टीबाबत दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे.

‘केजीएफ’ चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. अभिनेता यशचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला. हिंदी बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट तुफान चालला. ‘केजीएफ’च्या सुपरहिट यशानंतर कन्नड चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळाली असल्याची चर्चा सुरु झाली. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान महेश मांजरेकर यांनी कन्नड चित्रपटसृष्टीबाबत आपलं मत मांडलं.

आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस’ पुन्हा येतोय! आता हिंदीमध्ये मालिका प्रसारित होणार, नवा प्रोमो व्हायरल

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, “काही वर्षांपूर्वी कन्नड चित्रपटसृष्टी हळूहळू संपुष्टात येणार असं अनेकांना वाटत होतं. पण अभिनेता यशच्या ‘केजीएफ’ चित्रपटाने या चित्रपटसृष्टीला सावरलं. ‘केजीएफ’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन्ही भाग हिंदी भाषेमध्ये तयार केले नाहीत या गोष्टीचा आनंद आहे. कन्नड भाषेमध्ये हा चित्रपट तयार करत हिंदीमध्ये डब केला.” असं महेश मांजरेकर या कार्यक्रमादरम्यान म्हटले.

तसेच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, “कन्नड चित्रपटसृष्टीसारखं मराठी चित्रपटसृष्टीलाही नव्याने उभं राहण्याची गरज आहे. पण यासाठी यशसारखा अभिनेता असला पाहिजे.” सध्या मराठीमध्ये बऱ्यापैकी नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. महेश स्वतः काही चित्रपटांचा भाग आहेत.

आणखी वाचा – पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपबाबत बोलला करण जोहर, म्हणाला, “ब्रेकअप झालं अन्…”

‘केजीएफ’च्या दोन्ही भागांची कमाई पाहता आश्चर्यकारक आकडे समोर येतात. या दोन्ही भागांनी काही दिवसांमध्येच बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. अभिनेता यशच्या चाहत्यावर्गामध्ये वाढ झाली. इतकंच नव्हे तर कन्नड चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात टॉपचा कलाकार म्हणून त्याचं नाव आदराने घेतलं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor director mahesh manjrekar says kgf 2 star yash saved kannad film industry see details kmd