मराठीमध्ये सध्या नवनवीन विषयावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना तर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’ सारखे ऐतिहासिक चित्रपट तर बॉक्सऑफिसवर प्रचंड गाजले. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव यांची साकारलेली भूमिका तर सुपरहिट ठरली. प्रविण तरडे यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ‘सरसेनापती हंबीरराव’ला मिळालेल्या यशाबाबत या चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “आपल्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान आणि…” ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडबाबत अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

सरसेनापती हंबीरराव या इन्स्टाग्राम पेजद्वारे चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, “मित्रांनो, २७ मे रोजी आपला ‘सरसेनापती हंबीरराव’प्रदर्शित झाला. २७ मे नंतर आजपर्यंत जवळपास ३० पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. पण यातील कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक काळ चालला नाही. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणारा गेल्या अडीच तीन महिन्यातील आपला सरसेनापती हंबीरराव हा शेवटचाच चित्रपट आहे.”

“सध्याच्या काळात कोणताही चित्रपट हा चित्रपटगृहात सुपरहिट होण्याचं प्रमाण अतिशय दुर्मिळ होत आहे. अशा काळात आपण मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी आमच्या सारख्या चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या ‘उर्विता प्रॉडक्शन’च्या पहिल्या वहिल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाला ज्या पद्धतीने उचलून धरलं त्याबद्दल आपले आभार मानायला आज अक्षरशः शब्द अपुरे आहेत.” या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम पाहून संपूर्ण टीमच भारावून गेली होती. शिवाय हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरत असताना ‘सरसेनापती हंबीरराव’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

“आपण ‘सरसेनापती हंबीरराव’हा आपल्या घरचा चित्रपट समजून जे प्रेम दिलंत आणि ज्या पद्धतीने चित्रपटगृहात हा चित्रपट चालवलात नव्हे मी तर म्हणेन अक्षरशः वाजवलात त्याचं सर्व श्रेय हे सर्वस्वी फक्त आणि फक्त तुमचंच आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे टीम ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि उर्विता प्रॉडक्शनतर्फे मी जाहीर आभार व्यक्त करतो.” असं म्हणत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचं देखील कौतुक केलं आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ने पहिल्या तीन दिवसांमध्ये ८ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor director pravi tarde movie sarsenapati hambirrao team share special post on instagram and says thank you to audience see details kmd
First published on: 14-08-2022 at 09:35 IST