दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर तुफान चालत आहे. त्याचबरोबरीने त्यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचनिमित्त प्रवीण तरडे आणि या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी ते अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलत होते. चित्रपटसृष्टीमधील सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

अजूनही आपल्याकडे एखाद्या कलाकारला त्याच्या दिसण्यावरुनच काम मिळतं. वर्षानुवर्षे एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीबाबत तयार करण्यात आलेलं मत काही बदलेलं नाही असं प्रवीण तरडे यांच्या बोलण्यामधून स्पष्टपणे जाणवतं. लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की, “लेखन आणि दिग्दर्शनाला मी पहिलं प्राधान्य देतो. मी काही अभिनेता नव्हे. आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं. म्हणूनच आमच्यासारखी माणसं अभिनय करायची हिंम्मत करूच शकत नाहीत.”

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा – VIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

पुढे बोलताना ते म्हणाले की, ” मुळशी पॅटर्न अगदी आमच्यासारखाच चित्रपट होता म्हणून मी त्यात काम केलं. आपल्याकडे चेहरा, भाषा बघूनच अभिनेता निवडण्याची पद्धत आहे. आता केला आहे मी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.” प्रवीण तरडेंनी सध्या चित्रपटसृष्टीमध्ये काय परिस्थिती आहे हे सांगितलं आहे.

आणखी वाचा – “योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत

प्रवीण तरडे ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाबाबत तसेच इतर अनेक विषयांवर भरभरून बोलत होते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’बाबत उस्तुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा-संवाद लेखन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. येत्या २७ मेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.