scorecardresearch

Marvel च्या ‘मून नाइट’ सीरिजमधील अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचे निधन, स्कीइंग करताना हेल्मेट न घातल्याने झाला मृत्यू

दरम्यान त्याच्या निधनाचे वृत्त ऐकताच हॉलिवूडला धक्का बसला.

अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचा स्कीइंग करताना अपघातात मृत्यू झाला. गॅस्पर्डने ‘हॅनिबल रायझिंग’ या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही करण्यात आले होते. गॅस्पर्डने अनेक जाहिरातीतही काम केले आहे. विशेष म्हणजे गॅस्पर्ड हा मार्वल्सच्या आगामी सीरिज ‘मून नाइट’ मध्ये झळकणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना मंगळवारी घडली. गॅस्पर्ड स्कीइंग करत असतानाच त्याची दुसऱ्या स्कीयरशी टक्कर झाली. या धडकेमुळे ते दोघेही जमिनीवर कोसळले. यानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान गॅस्पर्ड हा काहीही हालचाल करत नव्हता. तो पूर्णपणे बेशुद्ध झाला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.

यानंतर गॅस्पर्डला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान त्याच्या निधनाचे वृत्त ऐकताच हॉलिवूडला धक्का बसला.

सलमान खानचे वकील श्रीकांत शिवडे यांचं निधन, ‘हिट अँड रन’ केससाठी केलं होतं काम

दरम्यान स्कीइंग करताना गॅस्पर्डची ज्याच्याशी टक्कर झाली, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. ला रोझिएर रिसॉर्टच्या संचालकाने बीएफएम टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, गॅस्पर्डने स्कीइंग करताना हेल्मेट घातले नव्हते. फ्रेंच स्कीइंग स्लोपवर हेल्मेट आवश्यक नसले, तरी प्रत्येकाला ते परिधान करण्याची सूचना दिली जाते. मात्र गॅस्पर्डने हेल्मेट न घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor gaspard ulliel dies during ski accident was to feature in marvels upcoming movie moon knight nrp

ताज्या बातम्या