अभिनेता हेमंत ढोमे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सामाजिक घडामोडींवरही तो आपलं मत अगदी परखडपणे व्यक्त करताना दिसतो. नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाबद्दल ट्वीट करत त्याने संताप व्यक्त केला आहे.

लेखक क्षितिज पटवर्धनने नंदुरबार जिल्ह्यातील मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाच्या बातमीचा फोटो ट्विट करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “आजची लोकसत्तामधली आदिवासी मुलीची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झालं. तिचा मृतदेह दीड महिन्यापासून मिठाच्या खड्डयात ठेवला आहे. तिच्या कुटुंबीयांचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. शासनाने दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

हेही वाचा >> ऋता दुर्गुळेला मराठी चित्रपटांची लॉटरी; ‘टाईमपास ३’च्या सुपरहिट यशानंतर नव्या भूमिकेत दिसणार

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. हेमंत ढोमेने क्षितिज पटवर्धनचं हे ट्वीट रिट्वीट करत घडलेल्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. “खरंच खूप सुन्न करणारी बातमी आहे. आपले आदिवासी विकासमंत्री नंदुरबार जिल्हाचे आहेत. तरीही ही परिस्थिती आहे. दुर्दैवं!”, असं त्याने ट्वीट करत म्हटलं आहे.

हेही वाचा >> IAS अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना सोनू सूदचा मदतीचा हात; स्कॉलरशिप आणि ऑनलाइन क्लासेसची सुविधा देणार

हेही पाहा >> Photos : माणुसकी! ‘तो’ दाक्षिणात्य अभिनेता घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाच्या लग्नाला आला अन्…

नेमकं काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील विवाहित महिलेची बलात्कार करून हत्या १ ऑगस्टला करण्यात आली. परंतु, पोलिसांनी आत्महत्या केली असल्याची नोंद केल्यामुळे पीडित महिलेच्या वडिलांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो ४३ दिवसांपासून मिठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. आपल्या मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करून या प्रकरणाचा छडा लावले जाईल या आशेवर ते आहेत.