scorecardresearch

“सव्वापाच वाट्या किरीट सोमय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा अन्…, असे बनतात चविष्ट संजय राऊत”, किरण मानेंची फेसबुक पोस्ट

नुकतंच किरण माने यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

kiran mane sanjay raut
किरण माने संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर कलाविश्वातील अनेक मंडळी वैयक्तिक मत मांडताना दिसतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर ते सातत्याने चर्चेत होते. नुकतंच किरण माने यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अनेक राजकीय नेत्यांची नाव घेतली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“लैच लवकर गेलास रं भावा…”, अभिनेते सतीश तारेंच्या आठवणीत किरण माने भावूक

“साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !”, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

“मागे ED लागलं तर…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. ‘उरले सुरले तोंडी लावायला ठेवलेत का लोणचं म्हणून सर’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या पोस्टवर केली आहे. तर एकाने ‘तीन पाकळ्या नेपाळी राणेंना टाकलं नाही म्हणून‌जाहीर निषेध’, असे कमेंट करताना म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor kiran mane share facebook post talk about sanjay raut and other political leader nrp

ताज्या बातम्या