महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशामध्येच एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. या गटाने न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे. राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील

राजकीय मुद्द्यांवर अभिनेते किरण माने नेहमीच आपलं मत मांडताना दिसतात. आपल्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र आपलं मत ते स्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचवतात. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत देखील याआधीही किरण यांनी पोस्ट शेअर केली होती. आता देखील त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर आपलं मत व्यक्त केलं आहे.

किरण माने यांची पोस्ट
किरण यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं की, “काय स्पीड हाय राव…आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ला सुनावणी ठरवलीसुद्धा…निकालच लावून टाकायचा ना थेट…जय सुप्रीम कोर्ट.”

आणखी वाचा – “बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व आणि…”, अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा खुलासा

किरण माने यांनी ही पोस्ट शेअर करताच नेटकरी देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. फक्त किरणच नव्हे तर कलाक्षेत्रातील इतर मंडळींनीदेखील सध्याच्या राजकीच घडामोडींबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. अभिनेता आरोह वेलणकर देखील ट्विटरद्वारे आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane talk about eknath shinde plea in supreme court challenged shivsenas move to disqualify him and 15 other mla see details kmd
First published on: 27-06-2022 at 12:32 IST