scorecardresearch

“मला तीन पाकिस्तानी मुलींबरोबर…” केआरकेचं वादग्रस्त ट्वीट चर्चेत

केआरकेचे ट्वीट अनेकवेळा चर्चेत येत असतात. त्याला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो

krk final
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. नुकताच प्रदर्शित झालेल्या पठाणबद्दल मात्र त्याने कौतुक केले आहे. बॉलिवूडप्रमाणे तो देशातील राजकीय सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. नुकतंच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल ट्वीट केलं आहे.

केआरके हा हिंदी तसेच भोजपुरी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. तो आता पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे यावेळी तो एक-दोन नव्हे, तर तीन नववधूंना घरी आणणार आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हंटलं आहे की, “मी ३ पाकिस्तानी मुलींबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. मी फक्त एकदाच लग्न केले आहे आणि इस्लाममध्ये मला चार बायका करण्याची परवानगी आहे.” अशी पोस्ट त्याने लिहली आहे.

“मी नवीन कलाकारांचा वापर करतो कारण…” चित्रपटांमधील कास्टिंगवर अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य

केआरकेच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी आता मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली जाते. एकाने लिहले आहे की, “भारतीय मुलींमध्ये काय कमी आहे?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “तुला पत्नी मिळाली आहे, हा एक चमत्कार आहे” तर आणखीन एकाने लिहले आहे, “पाकिस्तानमध्ये अजून इतके वाईट दिवस आले नाहीत.”

केआरके सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. ‘एक व्हिलन’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याला त्याच्या ‘देशद्रोही’ या चित्रपटावरून प्रचंड ट्रोल केलं जातं. यापेक्षा जास्त केआरके हा त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी आणि त्याच्या खास शैलीतल्या समीक्षणासाठी ओळखला जातो. तो ‘बिग बॉस ३’ या कार्यक्रमाचादेखील भाग होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:35 IST
ताज्या बातम्या