आर. माधवनच्या मुलाने देशासाठी स्विमिंगमध्ये पटकावले पदक

मुलाच्या अशा कामगिरीवर कोणताही बाप खुश होईलच. त्याने आपला हाच आनंद इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत व्यक्त केला.

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनच्या १२ वर्षाच्या मुलाने वेदांतने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. माधवनने सोमवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुलाचा पदकासोबतचा एक फोटो शेअर केला. वेदांतने थायलंड एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. भारतासाठी मिळवलेले वेदांतचे हे पहिले पदक आहे.

वेदांतच्या या कामगिरीवर माधवन फार खुश आहे. मुलाच्या अशा कामगिरीवर कोणताही बाप खुश होईलच. त्याने आपला हाच आनंद इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत व्यक्त केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा माझी बायको सरिता आणि माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. वेदांतने थायलंडमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्मिमिंग स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले. सर्वांच्या आशीर्वादाचे आभार.’ यावेळी माधवनने वेदांतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये वेदांतच्या हातात प्रशस्तीपत्रक आणि कांस्य पदक दिसत आहे.

माधवन हा बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकारांपैकी एक आहे. ‘थ्री इडियट्स’मधील त्याचा अभिनय आजही कोणी विसरु शकले नाही. त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले असून सध्या तो दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम करत आहे. सध्या माधवन वेब सीरिज ‘ब्रीद’मुळे चर्चेत आला आहे. तसेच रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ सिनेमातही तो काम करणार होता. पण खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने या सिनेमातून काढता पाय घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor madhavan son won bronze medal for india in swimming championship