‘ना साडीची चिंता ना आजू-बाजूच्या लोकांची’, सेल्फीसाठी महिलेचे पूशअप्स

मिलिंद सोमणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

milind soman,

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. तरुणांमध्ये मिलिंद सोमण अतिशय लोकप्रिय आहे. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. पण आता एका महिलेने मिलिंदसोबत सेल्फी काढण्यासाठी पुशअप मारले आहेत.

काही दिवसांपूर्वी मिलिंदने सोशल मीडिया पोस्टवर एक फोटो शेअर केले होता. हा फोटो शेअर करत त्याने ‘Pushups for selfie!’ असे म्हटले होते. मिलिंदने त्याच्यासोबत सेल्फी काढाणाऱ्यांसाठी एक अट घातली होती. जर तुम्हाला मिलिंद सोमणसोबत फोटो काढायचा असेल तर तुम्हाला पुशअप मारावे लागणार असे म्हटले होते. आता एका महिलेने सेल्फी काढण्यासाठी मिलिंदची ही अट मान्य केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

आणखी वाचा : अनुष्का शर्माचा भाऊ आहे ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात?, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिलेचा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘सेल्फी घेण्यासाठी पुशअप मारणाऱ्यांपैकी आवडता सेल्फी. रायपूरच्या एका छोट्या बाजारात मी होतो. तेथील चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेत होतो. तिथे एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारलं. मी म्हटलं १० पुशअप मारावे लागतील. त्या महिलेने कोणाताही विचार न करता मी माझ्या मोबाइलचा कॅमेरा ऑन करण्याआधीच १० पुशअप्स मारण्यास सुरुवात केली’ असे म्हटले.

पुढे तो म्हणाला, ‘ना साडीची चिंता, ना आजू-बाजूच्या लोकांची, कधीही पुशअप केले नाहीत याची तक्रार नाही. तिने कोणतेही कारण दिले नाही. कधी-कधी तुम्हाला आनंदी जीवनासाठी सक्षम होण्याची फार गरज असते. फक्त तुमच्याकडे हो मी हे करु शकतो बोलण्याची क्षमता लागते.’ सध्या मिलिंद सोमणने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor milind soman shares video of a woman doing push ups in saree for selfie avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या