scorecardresearch

नवाजुद्दीनला बदलायचंय बॉलिवूडचं नाव, सेटवर इंग्रजी भाषेमध्ये बोलणाऱ्यांबाबत म्हणाला…

हिंदी चित्रपटांच्या सेटवर हिंदी नव्हे तर इंग्रजी भाषेमध्येच सर्वाधिक बोललं जातं असं नवाजुद्दीन सिद्दीकीचं म्हणणं आहे.

nawazuddin siddiqui controversy, nawazuddin siddiqui on bollywood movies
हिंदी चित्रपटांच्या सेटवर हिंदी नव्हे तर इंग्रजी भाषेमध्येच सर्वाधिक बोललं जातं असं नवाजुद्दीन सिद्दीकीचं म्हणणं आहे.

बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव आवर्जून घेतलं जातं. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आपलं मत स्पष्टपणे मांडणं ही या अभिनेत्याची खासियत आहे. बॉलिवूडबाबत तसेच आपल्या चित्रपटांबाबत नवाजुद्दीन याआधीही खुलेपणाने बोलताना दिसला.

नुकतंच ‘इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह २०२२’ या कार्यक्रमामध्ये नवाजुद्दीनने हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याला बॉलिवूडबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. नवाजुद्दीनला चक्क बॉलिवूडचं नावच बदलायचं आहे. “बॉलिवूडमध्ये कोणते बदल घडले पाहिजेत असं तुला वाटतं?” हा प्रश्न नवाजुद्दीनला या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला. “मी बॉलिवूडमधील तीन गोष्टी बदलू इच्छितो. प्रथम मी बॉलिवूडचं नाव बदलून हिंदी चित्रपटसृष्टी ठेवेन, दुसरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या सेटवर रोमन लिपीमध्ये कलाकारांना स्क्रिप्ट दिली जाते. मी ती स्क्रिप्ट देवनागरी लिपीमध्ये मागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटांच्या सेटवर हिंदी भाषेमध्ये बोललं पाहिजे. चित्रपट हिंदी पण दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक देखील इंग्रजी भाषेतच बोलतात,” असे नवाजुद्दीन म्हणाला.

आणखी वाचा : KGF 2 च्या यशानंतर समुद्रकिनारी पत्नीसोबत रोमँटिक अंदाजात दिसला यश, फोटो व्हायरल


हिंदी चित्रपटसृष्टी असून देखील इंग्रजी भाषेमध्येच बोललं जातं ही गोष्ट नवाजुद्दीनला अधिक खटकते. या कार्यक्रमादरम्यान नवाजुद्दीनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं. तो म्हणाला, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची सर्वाधिक चांगली गोष्ट म्हणजे सगळेच तमिळ भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक, रंगभूषाकार सगळेच जण त्यांच्या भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात.”


पुढे नवाजुद्दीन म्हणाला, “हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असताना दिग्दर्शक वेगळ्याच पद्धतीने बोलतात, तर त्यांचे असिस्टंट काही वेगळंच चित्र तयार करत असतात आणि या गोंधळामध्ये कलाकार अगदी एकटा उभा असतो. रंगभुमीवरील एखादा कलाकार ज्याचं इंग्रजी भाषेवर फारसं प्रभुत्व नाही त्याला सेटवर दिग्दर्शक काय बोलत आहे हे काहीच कळत नाही.” नवाजुद्दीनने या कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडमधील सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor nawazuddin siddiqui talk about hindi film industry and actor wishes to change bollywood name kmd

ताज्या बातम्या