दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणला झाला करोना

पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती.

pawan kalyan,
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. सामान्य माणासांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत सर्वांनाच करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्रांत मेसी, गोविंदा अशा अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. आता दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच पवनने स्वत:ला फार्महाउसवर क्वारंटाइन केले असून सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहे. काही दिवसांपूर्वी पवन कल्याणने करोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण फुफ्फुसामध्ये इनफेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा पवनची करोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. सध्या पवनने स्वत:ला फार्महाउसवर क्वारंटाइन करुन घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan.k)

आणखी वाचा : कसला करोना आणि कसं काय! चित्रपट नाही तर ट्रेलर पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी

तिरुपतीच्या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर ३ एप्रिल रोजी पवन कल्याण हैदराबदला परतला होता. त्यानंतर त्याला थोडा त्रास व्हायला लागला. पवनने लगेच करोना चाचणी करुन घेतली आणि ती निगेटिव्ह आली होती. तरी देखील डॉक्टरांनी पवन कल्याणला फार्महाउसवर क्वारंटाइन राहण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनंतर करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan.k)

गेल्या काही दिवसांपासून पवन कल्याण चित्रपटसृष्टीपासून लांब होता. तो ‘वकील साब’ या चित्रपटाच्या माध्यामातून पुनरागम केले आहे. त्यामुळे होळीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ‘वकील साब’ हा चित्रपट बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor politician pawan kalyan tests positive for coronavirus avb