प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) याचा अलीकडे मुंबई पोलिसांसोबतचा (Mumbai Police) अनुभव चांगला नव्हता. महामार्गावर व्हीआयपी मुव्हमेंट सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी आपला अपमान केल्याचे प्रतीकने म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना त्याच्यासोबत घडलेली घटना शेअर केली आहे. यावर यूजर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे.
प्रतीकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मुंबईचा वेस्टर्स एक्सप्रेस हायवे व्हीआयपी मुव्हमेंटसाठी जाम करण्यात आला होता. शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी शेवटी चालायला सुरुवात केली. यावर पोलिसांनी मला खांद्याला धरून खेचले आणि एका मार्बल गोदामात थांबायला लावले. तोपर्यंत त्यांनी मला काहीच सांगितले नाही. मला अपमानित केलं.’




नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
प्रतीकच्या या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात होते आणि त्यामुळेच हे घडले असावे. प्रतीकला हा प्रकार कळताच त्याने कमेंट करत ‘अरे, मला माहीत नव्हते’ असे सांगितले.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजने प्रसिद्ध झालेला प्रतीक गांधी आता ‘वो लड़की है कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो सध्या पत्रलेखासोबत ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. याशिवाय त्याने विद्या बालन आणि इलियाना डिक्रूजसोबत एक चित्रपटही साइन केला आहे.