scorecardresearch

“मी त्याचा कॉल का नाही उचलला?”; मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगची भावूक पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

“मी त्याचा कॉल का नाही उचलला?”; मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगची भावूक पोस्ट
(photo-instagram@ jogpushkar)

देशात आलेली करोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घराघरात करोनाने शिरकाव केल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाचं कुणी ना कुणी गमावलं आहे. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांचा करोनामुळे मृत्यू झालाय. तर अनेकांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याला करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

अभिनेता पुष्कर जोगला देखील करोनामुळे त्याच्या मामाला गमवावं लागलं आहे. करोनामुळे त्याच्या मामाचा मृत्यू झालाय. मामाच्या मृत्यूनंतर पुष्करने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्याने एक खंत व्यक्त केलीय. मामाचा शेवटचा फोन न उचलण्याचं दु:ख त्याने या व्हिडीओत व्यक्त केलंय. यावेळी पुष्करला अश्रू आवरणं कठीण झालं. त्याचा तो कॉल शेवटचा असेल याची कल्पनादेखील त्याला नव्हती त्यामुळे “मी त्याचा फोन का नाही उचलला?” असं म्हणत पुष्करने दु:ख व्यक्त केलंय.

तसचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सध्याच्या काळात आपण एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं असल्याचं पुष्कर म्हणाला आहे. ” तुमच्या जिव्हाळ्याच्या माणसांची काळजी घ्या. त्यांच्याशई संवाद साधा. ”


पुढे पुष्कर त्याच्या कॅप्शनमध्ये म्हणाला, “मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली .काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याची पोस्ट मी टाकली होती. त्या वेळेसचा मिस्ड कॉल माझं मन अजून हि खात आहे .. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कांत रहा . लॉक डाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीयं. हे योग्य नाही . हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे. तेव्हा हेवे दावे , रुसवे फुगवे , वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक , मित्र परिवार व आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका. अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे .लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू .”

पुष्कर प्रमाणेच गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना करोनामुळे गमावलं आहे. करोनामुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली आहेत

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-05-2021 at 18:10 IST

संबंधित बातम्या